मंत्रालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

0
28

मुंबई : राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो, त्या मंत्रालयातील एकाच विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले हे सर्व कर्मचारी मंत्रालयातील महसूल विभागातील आहेत. महसूल विभागात काम करणारे 22 कर्मचारी एकाच दिवशी गैरहजर होते. याबाबत विभागाकडून माहिती घेतली असताना हे कर्मचारी आजारी असल्याने कामावर आले नसल्याचं समजलं. तर या 22 पैकी आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं आहे. उर्वरित कर्मचारीही आजारी असल्याने त्यांची कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे हा आकडा वाढण्याची चिन्हं आहेत. मंत्रालयातील एकाच विभागातील कर्मचाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याने या विभागाचे काम होणार कसं असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here