ऑनलाईन बुद्धीबळ ऑलम्पियाडमध्ये जिंकून भारताने रचला इतिहास

0
136

नवी दिल्ली : ऑनलाईन बुद्धीबळ ऑलम्पियाडमध्ये भारताने पहिल्यांदाच जिंकून इतिहास रचला आहे. हे विजेतेपद संयुक्तपणे भारत आणि रशियाला मिळालं आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामना रशियाविरुद्ध खेळला जात होता. पण इंटरनेटच्या कनेक्शनमुळे उरलेला सामना होऊ शकला नाही. यामुळे भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विजयी घोषित करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने प्रथमच ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित केली होती. या स्पर्धेत भारताचे कर्णधार विदित गुजराती, पूर्व विश्वविजेते विश्वनाथन आनंद, कोनेरू हंपी, डी हरिका, आर प्राग्गनानंद, पी हरिकृष्णा, निहाल सरीन आणि दिव्या देशमुख हे अंतिम सामन्यात भारताकडून प्रतिनिधित्व करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here