ओटीटी-समाजमाध्यमांच्या वापरासंदर्भात केंद्रसरकारची नवी मार्गदर्शक तत्व जारी

0
67

Aapli Maay Marathi News Network : सामाजिक माध्यम – सोशल मिडिया आणि ओव्हर द टॉप – ओटीटी वर टाकण्यात येणाऱ्या मजकुराबाबत नवीन मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने काल जारी केल्या. यात फेसबूक, ट्विटर आदी सोशल मिडिया कंपन्या आणि नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार आणि ओटीटी कंपन्यांना नवे नियम पाळणे बंधनकारक असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोशल मिडियाला वेगळी प्रणाली बंधनाकरक, नियमानुसार २४ तासात तक्रार नोंदवणे आणि १५ दिवसात तिचे निराकरण करणे, तक्रार निवारणाची जबाबदारी असलेल्या अधिकाराचे नाव जाहीर करणे बंधनकारक, अश्लिलतेबाबतचा विशेषत: महिलांबाबतचा मजकूर, चित्रे, व्हिडिओ आदी सामग्री २४ तासात हटवणे, कोणतीही अफवा, चुकीचा मजकूर संबंधित सोशल मिडियावर पहिल्यांदा कोणी टाकला याची माहिती सरकारला देणे बंधनकारक, सर्व प्लॅटफॉर्मवर पॅरेंटल लॉकची सुविधा असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ओटीटी आणि डिजिटल माध्यमांचे नियमन माहिती प्रसारण खात्याकडे, तर मध्यस्थ माध्यमांचे संचालन माहिती तंत्रज्ञान खात्याकडे राहील, असे सरकारने सांगितले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here