पुढील चार दिवस कोल्हापूर, सातारामध्ये अतिवृष्टी इशारा

0
51

Aapli Maay Marathi News Network : महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने काेकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून पुढील चार दिवस कोल्हापूर,सातारा, पुण्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

घाट माथ्यावर सध्या जोरदार पाऊस पडत आहे.डुंगरवाडी १००,लोणावळा, भिरा,ताम्हिणी ९०,दावडी,कोयना (पोफळी),खोपोली ७० मिमी पावसाची नोंद झाली होती. दिवसभरात महाबळेश्वर येथे ६६, पुणे ५, कोल्हापूर६, सातारा, नाशिक २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाची एखादी सर येत होती. पुढील चार दिवस पुणे,कोल्हापूर,सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इसल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here