ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन मंजूर

0
148

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ७ नोव्हेंबरला शौविकने हा अर्ज मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयात दाखल केला होता. यापूर्वी सुमारे एक महिना आधी मुंबई उच्च न्यायालयाने शौविकची जामीन याचिका फेटाळून लावली होती. ड्रग्स प्रकरणात त्याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती.

शौविकला ड्रग्स प्रकरणात ४ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर विशेष न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला होता. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याला ड्रग्स पुरवठा करण्यासाठी त्याने ड्रग विक्रेत्यांशी संपर्क साधला होता व ड्रग्स खरेदी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here