एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची सर्व पक्षीय नेत्यांची मागणी

0
76

मुंबई : कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. तसेच सरकारमधील आणि विरोधातील या दोन्ही बाजूच्या नेेत्यांनीही ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी करण्यात येत आहे.

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता या महिन्यात होणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी विद्यार्थ्यांच्या वतीने मी मा. मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करतो, अशी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पहाता या महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. बरेच विद्यार्थी कोरोना पाॅझिटिव्ह आहेत तर घरातील पालक कोरोनाग्रस्त आहेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांची ही मागणी आहे. भविष्य मोलाचे पण जीव अनमोल आहे, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

एमपीएससी विद्यार्थींच्या 11 तारखेची परीक्षा तातडीने पुढे घेण्यात घ्यावी. कोरोनाची ही दुसरी लाट भयंकर आहे सगळीकडे तुम्ही लॉकडाऊन केले आहे ,काही विद्यार्थी तर कोरोना बाधित आहे, त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, असं ट्विट मनसे नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांंनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here