मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालये १५ जानेवारी २०२१ पर्यंत बंद

0
86

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला, तरी अन्य देशांमध्ये आणि देशातल्या काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आणि सर्व महाविद्यालयं १५ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगपालिकेनं घेतला आहे.

त्याअंतर्गत महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आदेश जारी केले. तसंच सर्व वाणिज्य दुतावासांच्या शाळा १८ जानेवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना या आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत. याबाबत सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या व्यवस्थापकांना याबाबत कळवण्यात आलं आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here