वाढत्या कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

0
65

मुंबई : कोरोना रूग्णसंख्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढत असताना अनेक जिल्ह्यात प्रशासनामार्फत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाढती कोरोना रूग्णसंख्या लक्षात घेऊन, वसई- विरार महानगरपालिका क्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा 5 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी शाळा, जिल्हा परिषदेचा शाळा, सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रम शाळा, निवासी शाळा, कोचिंग क्लासेस 5 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.

आजारी असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल, याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापकांनी घ्यावी, असं देखील या आदेशात म्हटलंय.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात काल तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. पुणे, मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहे. काल पुण्यात पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here