अमृता वहिनींनी आपल्या गाण्याच्या छंदावर काम करावं!

0
74

मुंबई : सध्या पुण्याची रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने काही जिल्ह्यांना निर्बंधामध्ये सूट दिली होती. ज्या जिल्ह्याचा पाॅझिटीव्हीटी दर 4 टक्यांपेक्षा जास्त आहे. त्या जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यात पुणे जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यावरून अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावरून आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

रुग्ण संख्या आटोक्यात आहे म्हणून घराबाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करायचं आणि पुन्हा रुग्ण संख्या वाढली की सरकारवर खापर फोडायचं, असं डबल ढोलकी वाजवण्याचं काम अमृता वहिनींचं चालू आहे. त्यामुळे पुणेकरांनी काय करावं आणि काय करू नये हे सांगण्यापेक्षा वहिनींनी आपल्या गाण्याच्या छंदावर काम केलं तर बरं होईल, अशी झणझणीत टीका रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

पुण्यात 4 टक्के पाॅझिटीव्हीटी दर असताना पुणे का सुरू झालं नाही, हे मला समजत नाही. त्यामुळे पुणेकरांनी कोरोना नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा, असं अमृता फडणवीस पुण्यात झालेल्या एका महोत्सवात म्हणाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या मेट्रोच्या ट्रायलवरून देखील अजित पवार आणि सरकारला लक्ष्य केलं.

दरम्यान, पुण्यात निर्बंध शिथिल करायचे असतील तर प्रस्ताव पाठवा, असं आरोग्यमंत्री म्हणाले. मग प्रश्न हा पडतोय, असा प्रस्ताव मुंबईने आणि शिथीलता दिलेल्या इतर जिल्ह्यांनी दिला होता का?, असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here