आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ

0
143

Aapli Maay Marathi News Network :
एका शेतकऱ्याने वाळलेल्या मक्याच्या कणसाचे दाणे काढण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. हे जुगाड पाहुल उद्योगपती आनंद महिंद्रा अवाक झाले आहेत. त्यांनी या शेकऱ्याच्या टॅलेंटचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती दुचाकीच्या टायरच्या साहाय्याने मक्याचे दाणे काढत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे की, माझ्याकडे सतत नाविन्यपूर्ण व्हिडिओ क्लिप येत असतात. या व्हिडिओमध्ये शेतकरी गाडी आणि ट्रॅक्टरमध्ये काहीतरी कल्पक गोष्ट करत असतात. मात्र, दुचाकीचा अशा प्रकारचा वापर मी स्वप्नातही केला नाही, असंही आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.

या व्हिडिओमध्ये दुचाकी डबल स्टँडवर लावण्यात आली आहे. यात गाडीच मागच चाक जस फिरत आहे, तसं मकाचे दाणे खाली ठेवलेल्या कापडावर पडत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरस होत आहे. अनेकांनी या शेतकऱ्याच्या टॅलेंटला सलाम केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here