अशोक चव्हाण यांनी रस्त्यावरील खड्यांवरून चंद्रकांत पाटील यांना लगावला टोला

0
87

Aapli Maay Marathi News Network : महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत गेले होते. पाहणी करुन झाल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. व त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेसोबत महाआघाडी करण्यासंबंधी अशोक चव्हाण यांनी सांगितले की, “शिवसेनेसोबत जाण्याबाबत दिल्लीमधील नेत्यांमध्ये नाराजी होती. दूसरीकडे राज्यात भाजपकडून काँग्रेस संपवण्याची कारवाई सुरु होती. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील व्हावे लागले.

अशोक चव्हाण यांना रस्त्यांवरील खड्यासंबंधी प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांंनी केलेले खड्डे बुजवण्याचं काम माझ्याकडे असून तेच मी करत आहे. संपूर्ण मराठवाड्यात चांगले रस्ते पाहिजेत यासाठी मी विमानाने नाही तर कारने फिरत आहे”, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here