‘यासाठी’ कुस्तीपटू बबिताने शेतकरी बांधवांना हाथ जोडून केली विनंती!

0
308

नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन चालू आहे. केंद्राने कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी होत आहे. शेतकरी काही मागे हटायला तयार नाहीत. अशातच कुस्तीपटू आणि भाजपा नेत्या बबिता फोगाटने शेतकरी आंदोलनाबाबत वक्तव्य केलं आहे. आता असं वाटू लागलंय की शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं आहे. मी सगळ्या शेतकरी बांधवांना हाथ जोडून विनंती करते की त्यांनी कृपया आपापल्या घरी परत जावं, असं बबिता फोगटने म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही शेतकऱ्यांचे हक्क डावलणार नाहीत. काँग्रेस आणि डाव्या पक्षांतील नेतेमंडळी कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाहीत, असं म्हणत बबिता फोगटने काँग्रेसवर निशाणा साधला. बबिताने यासंदर्भात ट्विट केलं आहे. दरम्यान, आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. या आंदोलनावरून सध्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

<blockquote class=”twitter-tweet”><p lang=”hi” dir=”ltr”>अब लगता है किसान आंदोलन को टुकड़े टुकड़े गैंग ने हाईजैक कर लिया है।सभी किसान भाइयों से हाथ जोड़कर विनती करती हूं कृपया करके अपने घर वापिस लौट जाएं।माननीय प्रधानमंत्री <a href=”https://twitter.com/narendramodi?ref_src=twsrc%5Etfw”>@narendramodi</a> जी कभी भी किसान भाइयों का हक नहीं मरने देंगे।कांग्रेसी और वामपंथी लोग किसान का भला कभी नहीं कर सकते</p>&mdash; Babita Phogat (@BabitaPhogat) <a href=”https://twitter.com/BabitaPhogat/status/1338433913459417088?ref_src=twsrc%5Etfw”>December 14, 2020</a></blockquote> <script async src=”https://platform.twitter.com/widgets.js” charset=”utf-8″></script>

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here