…मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो ; धनंजय मुंडे

0
98

बीड : परळी येथे विठ्ठल मंदिर जिर्णौध्दार कार्यक्रमात खासदार प्रीतम मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आले होते. परळीच्या विकासावरून या दोघांमध्ये शाब्दिक टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रमात बोलताना प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर कोपरखळ्या लगावल्या.

परळीत सुरू असलेल्या विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अनेक खड्डे पडल्यामुळे मला या कार्यक्रमात येण्यास वेळ लागला, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी बोलताना प्रीतम मुंडेंना प्रत्युत्तर दिलं.

मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेलं परळीच्या विकासचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे, असं म्हणत धनंजय मुंडेंनी प्रीतम मुंडे यांना प्रतिउत्तर देत टोला लगावला.

दरम्यान,  मी आपल्या परळीच्या विकास कामाचा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना या ठिकाणी येण्यास वेळ लागला असावा, असं मला वाटतं आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here