अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला न्यायालयाने दिली स्थगिती

0
73

Aapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर मुंबई हाय कोर्टाकडून अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला 30 ऑगस्टपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारला नियमांप्रमाणे कारवाई करण्याची सूचना देखील यावेळी मुंबई हाय कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

मुंबई हाय कोर्टाच्या पुर्ण पीठाने मंगळवारी याबाबत आदेश जारी केला आहे.
जे नागरिक न्यायालयात याबाबत दिलासा मागु शकत नाहीत, त्यांना हे आदेश लागु आहेत. याआधी अंतरिम स्थगितीचा वेळ हा 13 ऑगस्ट पर्यंत होता. या दरम्यान अनधिकृत बांधकामे, लिलाव, कारवाई यासाठी हे आदेश आहेत. उच्च न्यायालयाने याबाबत स्युमोटो जनहित याचिका केली आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे प्रशासन न्यायालय निर्णयाने कारवाई करु शकते, असं देखेील मुंबई हाय कोर्टाने म्हटलं आहे.

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता, न्या. ए.ए सय्यद, न्या. एस.एस शिंदे, म्या. पी.बी वार्ले यांच्या पूर्ण पीठाने कोरोना काळात वेळोवेळी अशी मुदतवाढ दिली आहे. न्यायालयाचे काम मर्यादित स्वरूपात सुरू असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, आता राज्यातील परिस्थिती सुधारत असल्याचे देखील या पीठाने सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here