मुंबई भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने जीवनावश्यक वस्तू आणि अन्नाचे वाटप

0
61

Aapli Maay Marathi News Network : मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात व मुंबई भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व अन्नदान करण्यात आले आहे.

पूरग्रस्त नागरिकांसाठी राज्यभरातून मदतीचे ओघ सुरू आहेत. मात्र अन्न शिजवण्यासाठी साधने उपलब्ध नसल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबई भाजपा ओबीसी मोर्चाची टीम जीवनावश्यक वस्तू घेऊन चिपळणूमधील खेर्डी, माळेगावात पोहचली आणि स्वत: अन्न शिजवून नागरिकांना देत आहे. ओबीसी मोर्चाच्यावतीने गेल्या २ ते ३ दिवसांपासून सुमारे १५ ते २० हजार नागरिकांना अन्नदान करण्यात आले आहे.

मुंबई भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने नागरिकांना चादर, ब्लॅकेंट, पाण्याच्या बॉटल्स सारख्या जीवनावश्यक वस्तूंचे नागरिकांना वाटप करण्यात आले. यावेळी मुंबई भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र गावकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here