सतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत

0
78

मुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर टीका केली होती. या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

भास्कर जाधव, तुमची औकात 2024 ला दाखवून देऊ. वाळू चोर भास्कर जाधव, तुमच्यासारखे सतराशेसाठ जरी एकत्र आले, तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत. कुत्र्यासारखं भुंकत बसणं आणि समाजाला काही न देता नुसतं रडत बसणं हे तुमचं राजकारण लवकरच संपणार, असं म्हणत निलेश राणेंनी भास्कर जाधवांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

भास्कर जाधवांनी राणे पुत्रांवर टीका करताना नारायण राणेंवरही टीका केली होती.  शिवसेना वाढीमध्ये नारायण राणेंचा काढीभर हात नाही. राणे गेले तेव्हा शिवसेनेचे 9 आमदार घेऊन गेले. त्यातील एकतरी आमदार दुसऱ्या निवडणुकीत आला का?, ते स्वत: तरी आले का निवडून आले का, असं जाधव म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here