शासकीय अधिकाऱ्यांनी प्रेम व सेवाभावाने कार्य करावे : राज्यपाल

0
77

Aapli Maay Marathi News Network : मातृत्वभाव म्हणजे वात्सल्य व प्रेमभावना. ही भावना केवळ महिलांकडे असते असे नाही तर प्रत्येकामध्ये असते. शासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी आपले काम केवळ नौकरी म्हणून न करता मातृत्वभाव व सेवाभाव जागवून केले तर कामाचे सोने होईल, समाज उन्नत होईल व पुण्यार्जन देखील होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

पनवेल संघर्ष समितीच्या वतीने राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पनवेल, नवी मुंबई, मीरा भायंदर व भिवंडी येथे शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ‘कोविड संजीवनी पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ नेत्रशल्यचिकित्सक डॉ तात्याराव लहाने यांसह १५ शासकीय अधिकारी व समाजसेवकांना कोविड संजीवनी पुरस्कार देण्यात आले.

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या हानीबद्दल दुःख व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, करोना व अतिवृष्टी यांसारखी संकटे मनुष्याची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. करोना काळात पोलीस शिपायापासून महासंचालाकांपर्यंत तसेच पटवाऱ्यापासून सचिवांपर्यंत सर्वांनी चांगले काम केले.  संकटकाळी मतभेत विसरून समाजासाठी व देशासाठी कार्य करण्याची उन्नत भावना यावेळी पाहण्यास मिळाली असे नमूद समाजाप्रती सेवाभाव असाच नेहमी कायम राहावा अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. 

पनवेल संघर्ष समिती, अध्यक्ष कांतीलाल कडू व संपादिका निर्भीड लेख रूपा कांतीलाल कडू यांच्या कार्याचे कौतुक करताना समितीने आपले नाव ‘पनवेल सहयोग समिती’ असे करावे अशी सूचना राज्यपालांनी केली. कांतीलाल कडू यांनी प्रास्ताविक केले तर डॉ लहाने यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना त्यांच्या अनुपस्थितीत सन्मानित करण्यात आले. तर गणेश देशमुख, पनवेल महापालिका आयुक्त, डॉ गिरीशजी गुणे, मुख्य विश्वस्त गुणे  हॉस्पीटल,पनवेल, सुधाकर देशमुख, आयुक्त  भिवंडी महापालिका, डॉ प्रशांत रसाळ,  मुख्य कार्यकारी अधिकारी, कल्याण डोबिंवली स्मार्ट सिटी, सुजाता दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका, दत्तात्रेय नवले, प्रांताधिकारी, पनवेल विभाग, विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल, संजय शिंदे, उपायुक्त, मिरा भाईंदर महापालिका, शशिकांत तिरसे, कळंबोली प्रादेश‍िक परिवहन मोटार निरीक्षक, डॉ सच‍िन संकपाल, मुख्य अधिष्ठाता उपजिल्हा रुग्णालय पनवेल, डॉ प्रमोद पाटील, पनवेल उपजिल्हा रुग्णालयचे वैदयकीय अधिकारी, डॉ अर्चना राम थडानी, सामाजिक वैदयकिय तज्ञ व स्मिता गवाणकर, सूत्रसंचालक व वृत्तनिवेदिका यांना कोविड संजीवनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here