हिमा दासने आपल्या कामगिरीने देशातील मुलींसमोर एक आदर्श ठेवला!

0
156

Aapli Maay Marathi News Network :  भारताची प्रसिद्ध धावपटू हिमा दासची आसाम पोलीस दलात पोलीस उपअधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. आसाम राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिमा दासला डीएसपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिमा दासने आपल्या कामगिरीने देशातील मुलींसमोर एक आदर्श ठेवला आहे.

राज्य सरकारने धावपटू हिमा दासला आसाम पोलिसामध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. कारण तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीमुळे राज्याचे गौरव झाला असल्याचं मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे.

शाळेच्या दिवसांपासूनच मला पोलीस अधिकारी बनायचं होतं. माझ्या आईचंही हेच स्वप्न होतं. माझी आई मला मला दुर्गा पूजेच्यावेळी खेळण्यांमध्ये बंदूक द्यायची. माझ्या आईचीही इच्छा होती की मी आसाम पोलीस खात्यात काम करावं. आज माझ्याकडे जे काही आहे ते सर्व खेळामुळे असल्याचं हिमा दास म्हणाली. त्यासोबतच मी आसाम पोलीसमध्ये काम करतानासुद्धा मी धावपटू म्हणून करिअर सुरूच ठेवणार असल्याचंही हिमा दास म्हणाली.

दरम्यान, हिमाने आयएएएफच्या वर्ल्ड अंडर 20च्या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय धावपटू आहे. हिमाच्या नावावर 400 मीटर स्पर्धेचा राष्ट्रीय विक्रम देखील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here