‘मुझे वो दिन आज भी याद है जब…’ ; युसूफने शेअर केला भावूक व्हिडिओ

0
152

नवी दिल्ली : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. 2011 मध्ये भारताने जिंकलेल्या विश्वचषक मालिकेत युुसूफ पठान सामिल होता. विश्वचषक जिंकवण्यात युसूफचा महत्वाचा वाटा होता. मोक्याच्या क्षणी युसूफने विकेट काढले त्याच बरोबर संघाच्या गरच असेल तेव्हा देखील दमदार फलंदाजी देखील केली होती. संन्यास घेताना युसूफने फेसबुकवर एक भावूक व्हिडीओ टाकला आहे.

मुझे वो दिन याद है जब मैने पहली बार इंडिया की जर्सी पेहनी, असं म्हणत युसूफने जुन्या आठवणींना उजाळा दिला.  लहानपणापासून माझं आयुष्य एकाच गोष्टीभोवती फिरत आहे ते म्हणचे क्रिकेट. या काळात मी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय यांसारखे अनेक खेळ खेळलो पण आज वेगळा दिवस आहे, असं युसूफने सांगितलं आहे.

2007 आणि 2011 मध्ये विश्वचषकात भारतीय संघाचा भाग असताना खूप अनुभव आले. कोलकत्ता नाईट रायडर्स कडून खेळताना लोकांनी भरपूर प्रेम दिलं त्याबद्दल युसूफने त्यांचे आभार मानले. इरफानने पुढे काय? असा प्रश्न केला तेव्हा भरपूर प्लॅन आहेत, असं उत्तर युसूफने दिलं. वेगवेगळ्या प्रकाराच्या माध्यामातून मनोरंजन करत राहिल, असंही तो म्हणाला.

भारताचे प्रतिनिधित्व करताना मला नेहमी अभिमान वाटायचा. मी माझे राष्ट्रीय, घरगुती, आयपीेएल संघातील प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि माझ्या हितचिंतकांचे आभार मानतो. मी सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्ती घेतं आहे, असं युसूफ म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here