महिला स्वयंरोजगारासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचा उपक्रम

0
69

Aapli Maay Marathi News Network : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील महिलांना राज्य शासनाचे तसेच महानगरपालिकेचे जास्तीत जास्त स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी सभासद नोंदणी अर्ज तयार केले आहेत. यामुळे बचत गट, दिव्यांग महिला, विधवा महिला अशा विविध स्तरातील महिलांना याचा फायदा होईल. या सभासद नोंदणी अर्जाचे अनावरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मंत्री पशुसंवर्धन सुनील केदार, कृषी राज्य मंत्री विश्वजीत कदम, आमदार प्रणिती शिंदे,  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, शिवाजीराव मोघे, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे तसेच एनएसयुआयचे अध्यक्ष आमिर शेख आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here