जेईई मेन परीक्षा लांबणीवर

0
31

Aapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

यावर्षीची एप्रिलच्या सत्रातील जेईई मेन परीक्षा येत्या २७, २८ आणि ३० तारखेला घेण्यात येणार होती, ती आता स्थगित करण्यात आली आहे. आता या परीक्षेच्या तारखा नंतर, परीक्षेच्या १५ दिवस अगोदर जाहीर केल्या जातील.  दरवर्षी चार सत्रांमध्ये या परीक्षा घेतल्या जातात. यापैकी फेब्रुवारी आणि मार्च या दोन सत्रातल्या यावर्षीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here