काश्मीर भारताचं नंदनवन म्हणून ओळखलं जाईल – भगतसिंह कोश्यारी

0
22

मुंबई : हिंदी काश्मीर संगम- काश्मिर अनुष्ठानच्या अध्यक्षा तसेच लेखिका व समाजसेविका डॉ. बिना बुदकी यांच्या “केसर की क्यारी में आग की लपटे आखिर कब तक” पुस्तकाचं तसेच ‘कश्मीर संदेश’ या नियतकालिकाचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी प्रकाशन करण्यात आलं. यावेळी त्यांनी काश्मीर पुनश्च भारताचं नंदनवन म्हणून ओळखले जाईल, असं म्हटलंय.

काश्मीरमध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार होणं ही गौरवास्पद बाब आहे. मात्र संस्कृत ही सर्व भाषांची जननी असल्याने संस्कृतचे जतन आणि संवर्धन होणं गरजेचं असल्याचं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

काश्मीर ही अभिनवगुप्त, भरतमुनी, कल्हण प्रभृतींची तसेच काश्मीरी शैव तत्वज्ञानाची भूमी असून काश्मीरमध्ये भारतीय नाट्य शास्त्र, काव्य आणि साहित्याला महत्वपूर्ण स्थान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या 70 वर्षानंतर काश्मीरमध्ये शांततेसाठी प्रयत्न सुरू आहे. ते लवकरच यशस्वी होतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला आहे.

काश्मीर 700 ते 800 वर्षांपूर्वी भारताचे गौरव समजले जात होते. आता पुन्हा काश्मीरला गतवैभव मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तेथील सामान्य नागरिकही शांती निर्माण होण्यासाठी सकारात्मक आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तेथील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला, असं कोश्यारींनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here