२०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज ; रोहित पवार

0
83

Aapli Maay Marathi News Network : अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांचे फ्लोरिडातील पावसाचे भाषण सोशल मीडियावर चर्चेत आहे. या भाषणाची तुलना महाराष्ट्रातल्या थेट शरद पवार यांच्या साताऱ्यातल्या भाषणाशी होते आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे” असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 4 नोव्हेंबरला अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्षाची निवड होणार आहे. फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. या सभेनंतर जो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. ‘वादळ संपेल आणि नवीन दिवसाची सुरुवात होईल’, अशी कॅप्शन जो बायडेन यांनी फोटोखाली लिहली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here