पुण्यातील कोरोना प्रादुर्भाव असलेल्या ६ प्रतिबंधित भागात लॉकडाऊन

0
138

पुणे : राज्यातील लॉकडाउन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्यानंतर महापालिकेनेही याबाबत सुधारित आदेश काढले आहेत. त्यानुसार शहरातील करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या भागांत लॉकडाउनही वाढवण्यात आला आहे. शहरातील सुधारित कंटेन्मेंट झोन आयुक्तांनी २१ नोव्हेंबर रोजी जाहीर केले होती. त्यात सध्या ६ प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली. त्या सुधारित आदेशात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र, तसेच यापूर्वी परवानगी दिलेल्या अस्थापनांचे नियम कायम राहणार आहेत, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, शहरात गेल्या चोवीस तासांत ३७१ नव्या करोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, चौघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार शहरात एकूण बाधितांची संख्या १ लाख ७० हजार ३५० झाली असून, १ लाख ६० लाख ४८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात २९५१ स्वॅब टेस्ट घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here