महाराष्ट्र लढवय्या, महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही

0
21

मुंबई : महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्राला इतिहास आहे. बूड आहे म्हणून तो टिकला आहे. महाराष्ट्रनिर्मितीचा क्षण हा मंगलमयच असतो. तो दिवस महाराष्ट्राचे शौर्य व धैर्य दाखवणारा असतो. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

महाराष्ट्रनिर्मितीचा क्षण हा मंगलमयच असतो. तो दिवस महाराष्ट्राचे शौर्य आणि धैर्य दाखवणारा असतो. आज महाराष्ट्रावरचे संकट मोठं आहे. कोरोना विषाणूने मोठे आव्हान उभे केले आहे. शंभर वादळे, शंभर भूकंपांनी पडझड होणार नाही त्यापेक्षा जास्त पडझड एका विषाणूने केली. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील व विजयी होईल, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.

सभोवती वातावरण निराशा आणि मरगळ आणणारे आहे. मृत्यूंच्या बातम्यांनी मन रोज बधीर होत आहे. चांगले काही घडत नाही. घडण्याची शक्यता नाही. देश, राज्य, समाज, धर्म या सर्व संकल्पना बाद ठरवून प्रत्येकजण फक्त जगण्याचाच संघर्ष करीत आहे. अशा वातावरणात महाराष्ट्र दिन कसा साजरा करावा? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

ठाकरे यांनी महाराष्ट्राची सूत्रे एका विशिष्ट परिस्थितीत स्वीकारली. या राज्याचा रथ पुढे न्यावा. देशात राज्याचा नावलौकिक वाढावा. मराठी माणूस, मराठी भाषेला वैभव प्राप्त करून द्यावे, शिक्षण, उद्योग, व्यापार, पायाभूत सुविधांत महाराष्ट्राला शिखरावर न्यावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी काम सुरू केले, पण कोरोनाच्या संकटाने सर्व मनसुबे निर्बंधात अडकले, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here