एमपीएससीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, आयोगाचा निर्णय

0
43

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. कोणताही बदल परीक्षेच्या तारखेबाबत करण्यात आला नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत पार पाडली जाणार आहे.

सर्व स्तरातील व्यक्तींसोबत चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. पण विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट होते. पण आता ही परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्मातून महत्वाची मागणी केली आहे. ‘लॉकडाऊन’ असताना रविवारी (ता.11) होणाऱ्या #MPSC परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here