मुंबईची काल दिवसभराची आकडेवारी धक्कादायक

0
103

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. राज्यातील मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत कोरोनानं अक्षरशः कहर माजवला आहे. शनिवारी कोरोनाचे 9,090 रुग्ण सापडल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. तर शहरात कोरोनाचे शुक्रवारी 8,832 नवीन रुग्ण सापडलेत.

राज्यात दिवसभरात 49 हजार 447 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात काल दिवसभरात 37 हजार 821 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात दिवसभरात 277 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 55 हजार 565 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय.

पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा, असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये दिवसभरात 5 हजार 720 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3 हजार 293 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 44 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 9 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here