नितेश राणेंची महाविकास आघाडीच्या आमदारांना खुली ऑफर, म्हणाले ‘येणारा धोका समजा’

0
27

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीमधे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत सगळे गल्लोगल्ली फिरले. तरीही लोकानी नाकारले. महाविकास आघाडीमधल्या आमदारांना हा संदेश आहे, येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका, असं म्हणत नितेश राणेंनी आघाडीच्या आमदारांना भाजप प्रवेशाचं आमंत्रण दिलं आहे.

भाजप हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. नितेश राणेंनी आमदारांना थेट भाजप प्रवेशाची ऑफर दिली आहे. मात्र नितेश राणेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, मी पंढरपूरच्या मतदारांचे मनापासून आभार मानतो की, भारतीय जनता पक्षावर तिथल्या जनतेने विश्वास दाखवला आणि मागील दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैर कारभाराला, गलथान कारभाराला, भ्रष्टाचारी कारभाराला एक प्रकारे आरसा दाखवण्याचे काम हे पंढरपूरच्या जनतेने केले आहे. पंढरपुरमध्ये आम्हाला विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला आहे, हा विजय आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here