मुंबई : राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी होत असल्याचं चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र वैज्ञानिकांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. गेल्या चार-पाच दिवसांमध्ये आकडेवारी वाढल्याचं दिसत आहे. त्यासोबतच राज्याच्या टास्क फोर्सने संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी राज्यशासनाने घालुन दिलेल्या नियमांचं पालन करावं, अन्यथा कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा एकनाथ शिंदे दिला आहे. ठाणे जिल्हात संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने ऑक्सिजन प्लँटचे ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
राज्यात विविध महापालिका हद्दीमध्ये दोन ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी एमएमआरडीयच्या आणि राज्यशासनाच्या माध्यमातुन निधी देण्यात येत आहे. यावेळी बोलताना नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
दरम्यान, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर टास्क फोर्सने सर्तकतेच्या सुचना राज्यशासनाला दिल्या आहेत. ठाण्यात तसेच राज्यभरात 15 ऑगस्टपासुन रूग्णसंख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे त्यामुळे नागरिकांनी राज्यशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करावं, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.