अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड

0
111

Aapli Maay Marathi News Network :
ज्येष्ठ वकिल प्रशांत भूषण यांना कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने प्रशांत भूषण यांना १५ सप्टेंबरपर्यंत हा दंड भरण्यास सांगितला आहे. तसेच दंड न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची आणि तीन वर्षांकरता वकिली करण्यापासून रोखले जाईल, असेही सुप्रीम कोर्टाने यावेळी म्हटले आहे. प्रशांत भूषण यांना न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here