बावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई

0
31

Aapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अति निकडीच्या नऊ उद्योगांना यातून वगळण्यात आलं आहे. इतर उद्योगांना त्यांच्या अंतर्गत गरजांसाठी ऑक्सिजन आयात करणे किंवा स्वतःचे एअर सेपरेटर युनिट स्थापित करणे यासारख्या पर्यायी उपायांचा विचार करण्यास सांगण्यात आलं आहे.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व मुख्य सचिवांना या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयानं देखील द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीचा वेग वाढवला असून ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु करण्याचं नियोजन केलं जात आहे. 

यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येत आहेत. सरकार नियमितपणे राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनसह आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्यावर लक्ष ठेवत असून वेळोवेळी उद्भवणार्याक आव्हानांना सामोरं जात आहे. देशांतर्गत उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली देशभरात वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन, औषधांचा आवश्यक पुरवठा यासाठी एक गट स्थापन करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here