राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधत सुरू केला पोल

0
91

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेले कित्येक दिवस शेतकरी आंदोलन चालू आहे. राजधानीमध्ये प्रत्येक राज्यातून शेतकरी एकत्र आले असून कृषी कायदे मागे घेण्यासाठी कडाक्याच्या थंडीत सरकारविरोधात त्यांनी आंदोलन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधत एक पोल सुरू केला आहे.

या पोलमध्ये, पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यास नकार देत आहेत कारण… असं म्हणत गांधीनी चार पर्याय दिले आहेत. त्यामधील पहिला असा की, पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी आहेत, दुसऱ्या पर्यायामध्ये मोदींना क्रोनी कॅपिटालिस्ट चालवत आहे, हे दोन पर्याय आहेत.

तिसऱ्या पर्यायामध्ये मोदी हट्टी आहेत तर चौथा पर्याया असा की वरील सर्व. राहुल गांधींच्या या ट्विटर पोलला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं पहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here