लोकलसंदर्भात रेल्वेने सहकार्य करावे – अनिल देशमुख

0
93

मुंबई : रेल्वे प्रशासनाने मुंबईमधील लोकल सेवा सुरु करण्यासाठी सहकार्य करावे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. कोणतेही राजकारण यामध्ये आणले जाऊ नये, असेही त्यांनी रेल्वे प्रशासनाला खडसावले आहे. राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेला अनिल देशमुखांनी यावेळी वेळापत्रक सुचवल्याचेही सांगितले.

गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली लोकल सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला तसेच काही ठराविक प्रवाशांसाठी सुरु आहे. दरम्यान मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली असून रेल्वेला यासंबंधी विनंती करणारे पत्र देखील पाठवले आहे. लोकल प्रवासासाठी राज्य सरकारने वेळापत्रक तयार केले असून तेदेखील पत्रासोबत जोडण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here