राजू शेट्टी हे अजूनही स्वत:ला शेतकरी नेते समजतात ; प्रवीण दरेकर

0
94

Aapli Maay Marathi News Network : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजू शेट्टी यांच्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. राजू शेट्टी हे पूर्वी शेतकरी नेते म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता त्यांना राजकारणात जास्त रस आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांची शेतकरी नेते ही ओळख पुसली गेली आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

राजू शेट्टी हे अजूनही स्वत:ला शेतकरी नेते समजतात. हे खूळ त्यांच्या डोक्यात आहे. सत्य स्वीकारण्याचे धाडस राजू शेट्टी यांच्यात नाही. राजू शेट्टी यांच्यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. शेट्टी यांचे लक्ष्य आता केवळ विधानपरिषदेतील आमदारकी हेच आहे. यासाठी आता राजू शेट्टी काय करतात, हे पाहावे लागेल, असं दरेकर म्हणाले.

राजू शेट्टी कोणत्या जगात वावरत आहेत? शेट्टी यांचा बालेकिल्ला कधीच उद्ध्वस्त झाला आहे. या किल्ल्याचे बुरुज, चिरे आणि वीटा विखुरल्यामुळे त्याची डागडुजी करण्याची गरज असल्याचं दरेकर यांनी म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here