राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट जारी

0
52

मुंबई : राज्यातील मान्सून आता चांगलाच सक्रिय झाला आहे. काल रात्रीपासून कोकणसह मुंबईतील काही भागांत जोरदार पाऊस कोसळत आहे. शहरातील उपनगरांत होत असलेल्या पावसामुळे हवामान खात्याने मुंबईसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मुंबईव्यतिरिक्त ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाचे अधिकारी डॉ. जयंत सरकार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

आधी मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. मात्र आता बदललेल्या परिस्थितीनुसार यात बदल करत रेड अलर्ट देण्यात आलाय, अशी माहिती अधिकारी डॉ. जयंत सरकार यांनी दिली आहे. तसेच 45-50 किलोमीटर प्रति तास ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारं वाहण्याची शक्यता.

दरम्यान, हवामान खात्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला उद्या, गुरुवारीही पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना, मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here