राज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम

0
98

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राजेश टोपे यांनी याबाबत घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील 27 जिल्हयांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत तर 11 जिल्ह्यांमध्ये मध्ये निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट गेली नाही त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे 11 जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार असल्याचं आरोग्यमंंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ज्या 27 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत त्यामध्ये परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली, रायगड, ठाणे, मुंबई, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here