घंटानाद करा, नाही तर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका!

0
127

मुंबई : मंदिरे उघडी करण्याबाबतची मागणी विरोधी पक्षांनी राज्य सरकारकडे लावून धरली आहे. जर मंदिरे उघडली नाही तर आम्ही घंटानाद आंदोलन करू, असा इशारा मनसेने ठाकरे सरकारला दिला होता. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

घंटानाद करा नाही तर आणखी कसला नाद करा. पण आमचा नाद करायचा नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. माध्यमांशी बोलताना त्यांनी मनसेवर खोचक अशी टीका केली आहे.

राजकीय पोळ्या भाजून घेणारे हे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. पण त्यांचं या मागे राजकारण आहे हे सर्वसामान्य लोकांनाही माहीत आहे. विरोधकांनी भावनेचा नाही लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बिळात जातात, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. यावेळी बोलताना पेडणेकरांनी मार्शलवरही निशाणा साधला.

दरम्यान, मास्क न घालता फिरणारे अनेक लोक हुज्जत घालत असतात. अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हुज्जत घालून अरेरावी करणाऱ्या मार्शल विरोधात तक्रारी आल्यास अशा क्लिनअप मार्शलवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं पेडणेकरांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here