शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट-सुशील कुमार शिंदे

0
60

Aapli Maay Marathi News Network : पंतप्रधान मोदी व शरद पवार यांची बैठक झाली, काळजी करण्याचं काही कारण नाही. शरद पवार हे गुगली टाकण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांनी अशा अनेक गुगल्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत काळजी करण्याचं कारण नाही. महाविकासआघाडी सरकार एकदम भक्कम आहे. त्यांना काहीही धक्का लागणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलं.

“नाना पटोले जे बोलत आहेत ते सत्य आहे, आम्ही आमच्या पक्षाची बाजू मांडणारच ना? पक्ष खंबीर करण्याचा प्रयत्न करणारच. आम्ही तिथं एकत्र असलो म्हणून आमचा पक्ष आम्ही तोडमोडीला काढणार नाही. सोबत आहे तोपर्यंत जवळ राहणार पण जेव्हा आमच्या पक्षाची उभारणी करायची आहे, ती आम्ही करतच राहणार”, असं शिंदे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here