राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द

0
65

Aapli Maay Marathi News Network : कोविड संसर्गामुळे यंदाची राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कशा पद्धतीनं करायचं, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचं, गायकवाड यांनी सांगितलं.

त्या म्हणाल्या –शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेत आहोत की, दहावीचे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे ती रद्द करून त्या विद्यार्थ्यांना जे आहे, ते इंटरनल ॲसेसमेंट करून त्या संदर्भात कशा पुढे गेल्या पाहिजे, या संदर्भामधे आम्ही चर्चा करू आणि त्यासंदर्भामधला निर्णय लवकरच जाहीर करून.

या ठिकाणी मला सांगायलाच पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेड मार्क पाहिजे असतील किंवा ज्यांना जास्त मार्कासंदर्भात अपेक्षा असतील अशा विद्यार्थ्यांसंदर्भातसुध्दा परीक्षा घ्यायची किंवा कशा तऱ्हेने पुढे जायचं या संदर्भातला सुध्दा निर्णय आम्ही भविष्यामध्ये सांगू.  भारतीय शालांत प्रमाणपत्र परिषद – आयसीएसईनंही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचं पत्रक काल प्रसारित करण्यात आलं. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here