राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात – अविनाश दौंड

0
2472

मुंबई : संपुर्ण देशात करोनाची महालाट आली असून महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय स्फोटक झाली आहे. मा.मुख्यमंत्र्यांनी राज्यात दुसऱ्या लाॅकडाऊनचा अतिशय योग्य निर्णय घेतला असून या निर्णयाला संघटना जाहीर पाठिंबा देत असून संपूर्ण सहकार्य करणार आहे. मागील वर्षापासून करोना विरोधातील लढ्यात सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून काम केले आहे. विशेषतः अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्करून सेवा बजावली आहे. या लढ्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सद्यस्थितीत शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के ऐवजी ३०टक्के करणे गरजेचे आहे. याबरोबरच शक्य असेल तेथे घरुनच आॅनलाईन काम करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. याबाबत काही कार्यालयात शासनाच्या आदेशांची पायमल्ली होत असल्याचा मागील लाॅकडाऊन पासूनचा अनुभव असुन कर्मचा-यांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.या बाबींना वेळीच पायबंद घातला पाहिजे. सर्व शासकीय कार्यालयात वेळच्या वेळी सॅनिटायझेशन होणे आता बंद झाले आहे.ते तातडीने सुरू करुन कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांवर कडक निर्बंध घातले पाहिजेत.अशीही मागणी अविनाश दौंड यांनी केली आहे.

विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेतील आणि करोनाशी संबंधित सेवा देणाऱ्या कर्मचा-यांचा बाधित होऊन दुर्दैवाने मृत्यू झाल्यास शासनाने ५० लक्षाचे कवच दिले होते.आता तीन महिने उलटून सुद्धा शासनाने या योजनेला मुदतवाढ दिलेली नाही. याबरोबरच राज्यातील कोषागारे आणि अन्य काही कार्यालयात करोना काळातही कर्मचा-यांना सक्तिची उपस्थिती करण्यात आली आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ दुर्दैवाने देण्यात आलेला नाही .यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. यास्तव शासनाने या योजनेला मुदतवाढ देऊन संबंधित सर्वच विभागांतील कर्मचा-यांचा सामावेश करणे अत्यंत गरजेचे आहे असेही दौंड यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here