सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त

0
116

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता इडीकडून जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली मालमत्ता ही अंधेरीतल्या कालेडोनिया इमारतीमधील आहे. दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात शिंदे यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

मनी लॉन्ड्रिंग कायद्यांर्तग कारवाई केलेल्या मालमत्तांमध्ये अंधेरी, मुंबई येथील कॅलेडोनिया बिल्डिंगमधील 10,550 चौरस फूट दोन व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. 35..48 कोटींची मालमत्ता राज श्रॉफ आणि त्यांची पत्नी प्रीती श्रॉफ यांच्या मालकीची आहे. प्रीती श्रॉफ कॉंग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आहे.

दरम्यान,सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकने दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडलाा दिलेल्या 3,688.58 कोटी रुपयांचं कर्ज फ्रॉड घोषित केलं. या कंपनीची YES बँकमध्येही लोन घोटाळ्याबाबत चौकशी सुरू आहे. कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधु अटकेत असून ईडीने त्यांची संपत्ती जप्त केली आहे. येस बँक लोन घोटाळ्याप्रकरणी ईडीने बँकेचे माजी प्रमुख राणा कपूर आणि DHFL चे प्रमोटर्स कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांची 2400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी अटॅच आहे. यात राणा कपूर यांची 1000 कोटी आणि वाधवान बंधुंची 1400 कोटी रुपयांची प्रॉपर्टी सामिल असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here