पुजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड?

0
73

Aapli Maay Marathi News Network: पुजा चव्हाण प्रकरणातील ज्या आँडिओ
क्लिप सांताक्रुज येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्यात त्यामध्ये छेडछाड करण्यात येते की काय? तसेच मनसुख हिरेन यांचे शवविच्छेदन अहवालात ही छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करा, अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी केली.

आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, ठाकरे सरकारची हेराफेरी सुरुच अजूनही आहे. रोज नवीन हेराफेरी या ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एका गुन्ह्याला लपवण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय. पुजा चव्हाण या भगिनीच्या आत्महत्या, हत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजिनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे प्रकरण उघड झाले. त्याचा फायदा घेत राठोड प्रकरणातील आँडिओ क्लीप ज्या सांताक्रूझ येथील फाँरेन्सीक लँब मध्ये पाठवण्यात आल्या आहेत त्यामध्ये छेडछाड सुरु आहे की काय? तो आवाज संजय राठोड यांचा नाहीच असे अहवाल तयार होण्यासाठी पोलीस यंत्रणेमार्फत छेडछाड होण्याची शक्यता आहे.

तसेच मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसे शवविच्छेदन करतानाचे रेकाँर्डिग पोलीसांना पुर्णपणे देण्यात आलेले नाही. त्यामध्ये सुध्दा छेडछाड केली जाते आहे की काय ? अशी शंका आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी होण्याची गरज आहे असे आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एका पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीत सापडलेल्या नोटा तसेच पैसे मोजण्याचे मशीन हाच का तो आघाडी सरकारचा “किमान समान कार्यक्रम” आहे का? असा टोला ही आमदार. अँड आशिष शेलार यांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here