टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

0
149

Aapli Maay Marathi News Network : कोरोना प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट संघाने मागील ८ महिन्यांपासून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाहीये. आयपीएलच्या १३ व्या हंगामानंतर २७ नोव्हेंबर रोजी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे सामना खेळणार आहे. तसेच भारतीय संघ तीन वनडे सामने खेळणार असून यापैकी पहिला सामना २७ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. तसेच दुसरा सामना हा २९ नोव्हेंबरला तर तिसरा सामना हा २ डिसेंबरला खेळला जाणार आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे.

टी-२० मालिकेत सुद्धा तीन सामने खेळले जाणार असून पहिला सामना ४ डिसेंबर, दुसरा सामना ६ डिसेंबर आणि तिसरा सामना हा ८ डिसेंबरला खेळला जाणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर दोन्ही संघात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यामध्ये पहिल्या कसोटी सामन्याला १७ डिसेंबरपासून सुरूवात होईल. कसोटी सामन्याचं वैशिष्ट म्हणजे हा कसोटी सामना दिवस-रात्र असणार आहे. दुसरा सामना हा २६ डिसेंबर तर तिसऱ्या कसोटी सामन्याची सुरूवात ७ जानेवारी आणी चौथ्या सामन्याची सुरूवात १५ जानेवारीला होणार आहे.

वनडे मालिकेचे वेळापत्रक :

पहिली वनडे – २७ नोव्हेंबर, सिडनी, सकाळी ९.१० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरी वनडे- २९ नोव्हेंबर, सिडनी, सकाळी ९.१० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरी वनडे- २ डिसेंबर, कॅनबेरा, सकाळी ९.१० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

टी-२० मालिकेचे वेळापत्रक :

पहिली टी20 – ४ डिसेंबर कॅनबेरा, दुपारी १.४० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरी टी20 – ६ डिसेंबर, सिडनी, दुपारी १.४० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरी टी20 – ८ डिसेंबर, सिडनी, दुपारी १.४० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

कसोटी मालिकेचे वेळापत्रक :

पहिला कसोटी सामना – १७-२१ डिसेंबर, ऍडिलेड, सकाळी ९.३० वाजता (दिवस- रात्र) (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
दुसरा कसोटी सामना – २६-३० डिसेंबर, मेलबर्न, पहाटे ५ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
तिसरा कसोटी सामना – ७-११ जानेवारी, सिडनी, पहाटे ५ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
चौथा कसोटी सामना – १५-१९ जानेवारी, ब्रिस्बेन, पहाटे ५ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here