दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार

0
130

Aapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन न करता त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आता नववी आणि अकरावीच्या परीक्षा देखील घेण्यात येणार नाहीत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here