भाजप तुम्हाला गुलाम बनवू पाहतंय; राहुल गांधी

0
91

Aapli Maay Marathi News Network :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून देशाची आर्थिक स्थिती बिकट असून याला भाजप सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 2014 पासून भाजप सरकार सत्तेत आला असून त्यांनी आतापर्यंत प्रामुख्याने तीन चुकीचे निर्णय घेतले आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. यामध्ये नोटबंदी, चुकीचा जीएसटी आणि लॉकडाऊन हे असून त्याचा गंभीर परिणाम देशातील बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवर झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here