केंद्र सरकारकडून जाहीर होणारी आर्थिक पॅकेज ही तशी टीकेची धनीच!

0
73

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे इशारे-नगारे वाजत असतानाच केंद्र सरकारने आणखी एका ‘पॅकेज’ची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनामुळे ज्या क्षेत्रांना फटका बसला आहे अशा क्षेत्रांसाठी हे पॅकेज जाहीर केले आहे. सुमारे 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा हा ‘बुस्टर डोस’ आहे. यातील 50 हजार कोटी रुपये आरोग्य सुविधा उभारण्यासाठी तर उर्वरित 60 हजार कोटी इतर क्षेत्रांसाठी असतील, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

मृतांची संख्या आणि वेग एवढा भयंकर होता की, अंत्यसंस्कारांसाठी स्मशाने अपुरी पडली. तेथे मृतदेहांच्या रांगा लागल्याची भीषण दृश्ये मनाचा थरकाप उडविणारी होती. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात तर कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे मृतदेह गंगेत सोडून देण्याची वेळ जनतेवर आली होती. या सर्व अनुभवांनी सरकार शहाणं झालं म्हणा किंवा उशिरा शहाणपण सुचलं म्हणा, सरकारने आरोग्य सुविधांसाठी 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं हे चांगलंच झालं. त्यातील 23 हजार कोटी अर्भक आणि बालकांवरील उपचारांसाठी खर्च केले जाणार आहेत, असं शिवसेनेनं म्हटलंय.

बाल आरोग्यासाठी हा निधी असल्याने राज्यांनाही त्याचा लाभ लवकर होऊ शकतो, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. त्याचा फायदा कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देताना होऊ शकेल. कारण या लाटेचा एक इशारा लहान मुलांबाबत आहे. कोरोना महामारीने आरोग्यच नव्हे तर सर्वच क्षेत्रांचे कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे त्यांचेही आर्थिक लसीकरण गरजेचेचं होतं, असंही शिवसेनेनं म्हटलंय.

दरम्यान, सरकारकडून जाहीर होणारी आर्थिक पॅकेज ही तशी टीकेची धनीच होत असतात. या टीकेत तथ्य नसतं असं नाही. पण कोरोना महामारीमुळे तडाखा बसलेल्या सर्वच क्षेत्रांना आर्थिक मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करणं केंद्र सरकारचं मुख्य कर्तव्यच आहे, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here