अमेरिकेत वर्णद्वेषाविरोधात हजारो लोकांचे आंदोलन!

0
113

Aapli Maay Marathi News Network :
अमेरिकेतील वर्णद्वेषाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त वॉशिंग्टनमध्ये होणाऱ्या निदर्शनात लोकांनी वर्णद्वेषाच्या आणि कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अमानुष हिंसाचाराविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांच्या वर्णद्वेषाच्या प्रवृत्तीविरूद्ध निदर्शक २५ मेपासून अमेरिकेत आडोनं करत आहेत. २५ मे रोजी मिनेसोटा राज्यातील कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लोयड याचा एका पोलिसाने त्याच्या गळ्यावर गुडघ्याने आघात करून निर्घृणपणे हत्या केली होती.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एका ट्विटमध्ये नागरिकांना वर्णभेदाविरूद्ध निदर्शने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी पुढील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जनतेने मोठया प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी त्यांनी सरकारच्या वर्णद्वेषी कृती आणि निदर्शकांवर दडपण आणणाऱ्यांवर टीका केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या एका निवडणूक भाषणात निदर्शकांना गुंड व मवाली असे वर्णन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here