आयुर्विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय नेतृत्व हरपले-अविनाश दौंड

0
272

Aapli Maay Marathi News Netwrok : काल दिनांक ७ सप्टेंबर रोजी All India Life insurance corporation Employees Federation या राष्ट्रीय संघटनेचे माजी जनरल सेक्रेटरी कॉ. अरविंद नाचणे यांचे वयाच्या 86 व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे संस्थापक आदरणीय र.ग.कर्णीक यांचे ते फार जवळचे सहकारी होते आणि त्यांच्या विचारसरणी वरही समाजवादी ध्येय धोरणांचा मोठा पगडा होता.अशी माहिती अविनाश दौंड यांनी दिली आहे.

भारतीय कामगार चळवळीतीलच नव्हे तर जागतिक ऐतिहासिक लढाऊ नेतृत्व कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली काॅ.नाचणे यांनी आपल्या संघटनात्मक कार्याची सुरुवात केली. त्यांच्या सततच्या संघर्षाने 1956 साली विमा व्यवसायांचे राष्ट्रीय करण झाले. या निर्णयामुळे देशातील लक्षावधी आयुर्विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सेवेची शाश्वती आणि भरघोस आर्थिक लाभ प्राप्त झाले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सन १९७७-७८ च्या ५४ दिवसांच्या ऐतिहासिक संपात स्वर्गीय कर्णिक साहेबांची आणि त्यांची जवळीक वाढिस लागली.

सन १९९० साली सरकारी कर्मचारी, बॅंक व विमा कर्मचारी यांची सेवा क्षेत्र समिती स्थापन करण्यात येऊन अनेक कार्यक्रम आणि उपक्रम संयुक्त पणे राबविण्यात येऊ लागले. तदनंतर राज्यात सर्वच कामगार संघटनांची कामगार संघटना संयुक्त कृति समिती,स्थापन करण्यात आली. या समितीच्या वतीने जोमदार कार्य सुरू झाल्यापासून काॅ. नाचणे, बॅंक एम्प्लॉइज फेडरेशनचे काॅ. धोपेश्वरकर यांनी मा.कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ३० वर्षे आदर्शवत संघटन कार्य केले आहे.असे प्रतिपादन दौंड यांनी केले. तसेच काॅ.नाचणे यांनी राज्यातील अग्रगण्य महाराष्ट्र टाइम्स व लेाकसता या दैनिकात कामगार चळवळी विषयक अभ्यासपूर्ण लिखाण सातत्याने करुन जनसामान्यांना कामगारांची बाजू पटवून दिली.त्याबरोबरच विमाकामगार या आपल्या संघटनेच्या मुखपत्रातून विमाकामगारांचे ४० वर्षे उत्तम प्रबोधन त्यांनी केले.

कॅा अरविंद नाचणे हे परखड पुरेागामी तत्त्वांचे, समाजवादाची कास धरणारे, साहित्य कला संस्कृती वसंगीत यांचे जाणकार असे बहुआयामी व्यक्तित्वाचे हेाते. त्यांच्या जाण्याने समग्र कामगार चळवळीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे असे प्रतिपादन अविनाश दौंड यांनी केले आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here