मुंबईतील कोरोना बळींचा आकडा लपवला जातोय – देवेंद्र फडणवीस

0
67

मुंबई :  कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. फडणवीसांनी या पत्रामध्ये मुंबईच्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्याबाबत मोठा आरोप केला आहे.

आपल्याला जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचं नाही. कोरोना कमी व्हावा, ही आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. मात्र संसर्गदर 15 टक्क्यांच्या पुढे असताना कोरोना कमी होतोय, असं आभासी चित्र तयार करणं योग्य होणार नाही. कोरोना लाटेची सायकल आपण राज्यात, देशात आणि जगात अनुभवली आहे.हे या सायकलदरम्यान आरोग्य सेवा आणि रुग्ण व्यवस्थापन महत्त्वाचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शिखरावर गेल्यावर पुन्हा रुग्णसंख्या मॉडरेट होते आणि कमी झाल्यावर श्रेयाचे दावेही जनतेने बघितले आहेत. शिखरावरचा वेळ कमीत कमी कसा करता येईल आणि त्यादरम्यान आपत्ती कशी कमी करता येईल हे पाहायला हवं असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर राज्यात जवळजवळ 40 टक्के चाचण्या या अँटीजेन पद्धतीने होत आहेत. 26 एप्रिल रोजी नोंदलेल्या मुंबईतील 28 हजार चाचण्यांमधील 40 टक्के अँटीजेन चाचण्या गृहित धरल्या तर केवळ 16,800 आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. इतक्या कमी संख्येत जर आरटीपीसीआर चाचण्या होत असतील तर मुंबईचे नेमकं चित्र डोळ्यापुढे येऊच शकणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here