राजेश सापते ह्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी

0
141

Aapli Maay Marathi News Network : मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित कला-दिग्दर्शक श्री. राजेश सापते ह्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या आरोपी व खंडणीखोर गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा व्हावी म्हणून फिल्म, टेलिव्हिसन, इंटरनेट, एंटरटेनमेंट, ऍड इंडस्ट्री वर्कर युनियन तर्फे दिंडोशी पोलीस चौकीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.कांबळे ह्यांना संघटनेचे चेरमन-श्री.अनुप दादा मोरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी नितीन मधुकर कोदे, सिनिअर व्हाईस चेरमन सुरेश मोरे, खजिनदार अनिकेत बांदल, व्हाईस चेरमन राजू महाडिक, गिरीश नायर, मुरगन तेवर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राजेश सापते यांनी शनिवारी सकाळी पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये राजेश सापते म्हणाले होते, ‘मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की
राजेश सापतेने पैसे दिलेले नाहीत.’

‘हे कालही मी क्लीअर केलं आहे की नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी हेही सांगितलं की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट ठेवलेलं नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतावत आहेत. ते माझं कुठचंही काम सुरु होऊ देत नाहीयत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तात्काळ सुरु करायचे आहे. त्यातलं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नाहीयत. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here